‘कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई’

कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. […]

‘कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई’

कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

कोल्हापुरात काही तरुणांनी आक्षेपार्ह व्हाट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकारावरून कोल्हापुरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. कोल्हापुरात या वादानंतर एका गटाचं आंदोलन चिघळलं आहे. कोल्हापुरातील या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी या परिषदेत सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वाचं सहकार्य गरजेचं आहे. जे अधिकारी आहेत, त्यांच्याशी मी स्वत: वैयक्तिक बोलत आहे. सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन करतो. मी अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घातलं जाणार नाही. मी स्वत: अधिकऱ्यांच्या संपर्कात आहे’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number