सुरत आणि अहमदाबादमध्ये घुसखोरांवर कारवाई; दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात

गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी पोलिसांनी घुसखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले.

सुरत आणि अहमदाबादमध्ये घुसखोरांवर कारवाई; दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात

मुंबई : गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी पोलिसांनी घुसखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना घुसखोरांची लवकरात लवकर ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आवाहन केले होते.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दोन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केल्यानंतर आता आणखी तीन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. एकूण पाच अतिरेक्यांची घरे पाडून लष्कराने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे.

हेही वाचा : 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; काश्मिरातून आतापर्यंत 800 पर्यटक परतले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत 6 दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यामध्ये लश्कर ए तय्यबाचा आसिफ शेख, आदिल ठोकर, हरिस अहमद, जैशचे अहसान उल हक, झाकीर अहमद गनई आणि शाहिद अहमद कुटे यांचा समावेश आहे. यापैकी जैशचा अहसान 2018 मध्ये पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन परतला होता. पहलगाम हल्ल्यात आसिफ आणि आदिलची नावे समोर आली होती. त्राल, अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथे शोध मोहिमेदरम्यान लष्कराने ही कारवाई केली. शुक्रवारी सकाळनंतर, शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, आज सकाळी 3 वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेने, एसओजी, ईओडब्ल्यू, झोन 6 आणि मुख्यालयातील पथकांसह, अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी एक कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केले. या ऑपरेशन दरम्यान, 400 हून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे डीसीपी अजित राजन यांनी ही कारवाई केली आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number