शनिवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास सोमाटणे गावच्या हददीत, जि.पुणे या परीसरात सापळा लावुन औषधे वाहतूक करण्याच्या नावाखाली गोवा राज्य निर्मीत आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मदयाची अवैधरीत्या तस्करी करुन वाहतूक करणारा भारत बेंझ कंपनीचा एक २५२३ मॉडेलचा दहाचाकी कंटेनर ट्रक जप्त करून कारवाई करण्यात आली. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये गुन्हयातील विविध ब्रँडचे विदेशी मदयाचे आणि बिअरचे मिळून एकूण ८४५ बॉक्स असा मुद्देमाल मिळुन आला. सदर मुददेमालामध्ये फक्त गोवा राज्यात निर्मिती व विक्री करता असलेले विविध प्रकारचे विदेशी मदय आणि बिअर असा एकूण ८६,००,९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल भारत बेंझ कंपनीचा दहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये मिळून आला.
सदर गुन्हयामध्ये वाहनासह एकूण रुपये ८६,००,९६० इतक्या किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये वाहनचालक आरोपी इसम नामे १) शंकरलाल नारायण जोशी वय ४६ वर्ष व्यवसाय ट्रक चालक रा जैन मोहल्ला, बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपूर राजस्थान याला जागीच अटक केली आहे. सदर गुन्हयामध्ये ओमपुरी नावाचा इसम फरार आहे. अटक आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८१.८३,९०,१०३ व १०८ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाईत, संजय सराफ, निरीक्षक, रा.उ.शु. तळेगाव दाभाडे विभाग, पुणे, दिपक बा. सुपे, दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु, तळेगाव दाभाडे विभाग, पुणे, श्रीमती प्रियांका एन राठोड, दुय्यम- निरीक्षक, रा.उ.शु, पुणे,सागर धुर्वे, आर. सी. लोखंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, संजय गोरे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. दिपक बा. सुपे दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु तळेगाव दाभाडे विभाग, बीट क्र. २ हे करीत आहेत.