Mumbai Local Crime : "माझ्याकडून मोठा कांड झाला" रात्री घरी पोहोचताच रोशनची पहिली कबुली घरच्यांना; घरच्यांचा समज मात्र वेगळाच, पुढे काय झालं?"

मंगळवारी 23 दून रोजी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची आरोपी रोशन सुवर्णा याने एका किरकोळ वादातून हत्या केली. या प्रकरणाबाबत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Mumbai Local Crime : &quotमाझ्याकडून मोठा कांड झाला&quot रात्री घरी पोहोचताच रोशनची पहिली कबुली घरच्यांना; घरच्यांचा समज मात्र वेगळाच, पुढे काय झालं?&quot

मंगळवारी 23 दून रोजी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची आरोपी रोशन सुवर्णा याने एका किरकोळ वादातून हत्या केली. या प्रकरणाबाबत आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. घटनेच्या काही काळ आधी रोज एसी लोकलने जाणारा रोशन सुवर्णा एसी लोकल चुकल्याने फर्स्ट क्लास डब्यात चढला होता. इतकच नव्हे तर बारकोड लेबलिंगचे काम करणारा रोशन सुवर्णा कार्गोपासून अंधेरी स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्याने रिक्षा केली होती त्या रिक्षावाल्यासोबतही त्याचे वाद झाले होते. त्याने उशीर झाल्यामुळे अंधेरी ते मीरारोडला जाण्यासाठी कैब बुक करण्याचे प्रयत्न केले होते मात्र पावसामुळे कॅब मिळाली नसल्याने लोकलने जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- Bhiwandi Crime News : चिमुकलीला खाऊचे आमिष देत 18 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार; नागारिकांमध्ये संतापाची लाट

मयंकच्या हत्येनंतर रोशनची पहिली कबुली कोणाला?
मयंकची हत्या केल्यानंतर आरोपी रोशन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरला आणि मीरा रोड येथील आपल्या घरी गेला होता. यानंतर घरी पोहोचताच त्याने आपल्या गुन्ह्याची पहिली कबुली त्याच्या वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना दिली, "माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय," असं म्हणत त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत हसण्यावारी नेले. यानंतर घरच्यांनी त्याच्या बोलण्याकडे लक्ष न दिल्याचे समजून तो सकाळच्या सुमारास कुर्ला मार्गे नवी मुंबईला पोहोचला आणि तिथून थेट बेंगळुरूला (मंगळुरू) पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याचा प्लॅन यशस्वी होण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्यासमोर तगडी फिल्डिंग लावली आणि त्याला अटक केली. 

हेही वाचा- Ketan Agarwal Murder Case : "तिलाही तसंच खाली ढकला, एक वडील म्हणून मी सांगेन" केतनला जीवे मारणाऱ्या सियाविरोधात आई-वडिलांनी केली मोठी मागणी

आरोपी रोशनचे तपासात सहकार्य नाही, पोलिसांचा दावा
तसेच रोशन विरोधात पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवले असून काही गोष्टींचा सुगावा पोलिसांना लागला आहे. धावत्या लोकांमध्ये प्रवाशाची सुरा भोसकून हत्या करणाऱ्या आरोपी रोशन सुवर्णाने सुरा त्याच्या मित्राकडून घेतला होता. रोशनचा परमार नावाचा मित्र इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो तसेच परत आलेल्या (रिटर्नच्या) वस्तूंची तो विक्री देखील करत असल्याची माहिती आहे. 
हत्येत वापरण्यात आलेला सुरा देखील रिटर्नचा होता जो त्याने रोशनला दिला. रोशनने सुरा आपल्या बागेत ठेवला होता.

रोशनला कोणावर हल्ला करायचा होता का? म्हणून त्याने सुरा सोबत ठेवला होता की, तो स्वसंरक्षणासाठी होता की, विकायला सोबत ठेवला होता याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेत सूऱ्यासह उभा असलेला प्रवासी आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दुसरा प्रवासी हे दृश्य बघून डब्यातील इतर प्रवासी हादरून गेले आणि कोणी त्यानंतर रोशनच्या नादी लागलं नाही. बोरिवली स्थानकात लोकल येताच रोशनने धावत्या लोकल मधून उडी मारली आणि पसार झाला. सुरा देखील त्याने बोरीवली रेल्वे स्थानक परिसरातच कुठेतरी फेकला असून त्याचाच सध्या पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान आरोपी रोशन सुवर्णा तपासात सहकार्य करत नसल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number