बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बीड जिल्ह्यात या महिन्यात ६० पोस्कोचे गुन्हे दाखल झाले आहेत. आंबेजोगाईमधील प्रकार अत्यंत गंभीर असून अल्पवयीन मुली बालकल्याण समितीकडे आलेल्या आहेत. त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला असून ती २० आठवड्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.
पाच ते सहा महिन्यांत पैशाच्या जेवणाचे आमिष दाखवून ४०० ते ५०० लोकांनी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. यात २ पोलीस कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई सुरू आहे मात्र सुज्ञ नागरिक म्हणून अशा घटना रोखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. अभय वणवे यांनी केले आहे