साडेतीन लाख भाविकांच्या वास्तव्याची सोय

चंद्रभागेच्या पहिले तीरावर वारकरी भक्तांना राहण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून ६५ एकरची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये वारकरी भक्तांसाठी साडेचारशे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे स्वच्छतागृहे महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, आरोग्य व्यवस्था पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. संतांच्या पालख्यांचे स्वागत आता सोलापूर जिल्ह्यात होत असताना दुसरीकडे मात्र पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नगरपरिषद यंत्रणा […]

साडेतीन लाख भाविकांच्या वास्तव्याची सोय

चंद्रभागेच्या पहिले तीरावर वारकरी भक्तांना राहण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून ६५ एकरची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये वारकरी भक्तांसाठी साडेचारशे प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येथे स्वच्छतागृहे महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, आरोग्य व्यवस्था पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

संतांच्या पालख्यांचे स्वागत आता सोलापूर जिल्ह्यात होत असताना दुसरीकडे मात्र पंढरपुरात वारकऱ्यांच्या स्वागतासाठी नगरपरिषद यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज होताना दिसत आहे. पालिकेच्या ६५ एकर परिसरात साधारण साडेतीन लाख भाविक वास्तव्यास राहतील इतक्या क्षमतेची सर्व व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन मदत केंद्र देखील या ठिकाणी स्थापन केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने केलेल्या तयारीबद्दल आणि भाविकांच्या वास्तव्याबद्दल आता वारकरी भक्तांमध्ये समाधान आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number