Beed Accident : अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात; टिप्परने धडक दिल्याने 5 जण जखमी एकाची प्रकृती गंभीर

आमिर हुसैन, प्रतिनिधी बीड : बीड शहराजवळील महालक्ष्मी चौक ते संभाजी राजे चौक बायपास मार्गावर सकाळी 9 वाजता टिप्पर आणि बोलेरोची भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी नंदा बडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील कुटुंबीय बोलेरोने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. बोलोरो […]

Beed Accident : अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या बोलेरो गाडीचा भीषण अपघात; टिप्परने धडक दिल्याने 5 जण जखमी एकाची प्रकृती गंभीर

आमिर हुसैन, प्रतिनिधी

बीड : बीड शहराजवळील महालक्ष्मी चौक ते संभाजी राजे चौक बायपास मार्गावर सकाळी 9 वाजता टिप्पर आणि बोलेरोची भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरोमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी नंदा बडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील कुटुंबीय बोलेरोने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. बोलोरो गाडी ही दीड बायपास रोडवरील पांगर बावडी ब्रिजजवळ आली असता अचानक टिप्परने वळण घेतल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये शिवकन्या बडे, नंदा बडे, राणी बडे, अभिषेक बडे आणि गायत्री कचरे यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. नंदा बडे या अपघातात बेशुद्ध झाल्या असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच घाडगे नामक रुग्णवाहिका चालकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा : Wardha Accident: ओव्हरटेकच्या प्रयत्नात घडला अनर्थ; तीन वाहनांचा भीषण अपघात, दोन जणांचा दुर्दैवी अंत

बीड शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख मार्गांवर टिप्पर आणि हायवा वाहने भरधाव धावत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही वाहनांवर वाहन क्रमांक स्पष्ट नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील टिप्पर-हायवांची तपासणी करून नियमबाह्य वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल या अपघातानंतर उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number