Accident on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पेटल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात सोमवारी, सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे.

Accident on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पेटल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात सोमवारी, सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कार तब्बल 100 फूट फरफटत गेली. अपघातानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दोन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र चालकाचे पाय अडकले असल्याने त्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, बचावकार्य सुरू असतानाच अचानक कारच्या पुढील भागाने पेट घेतला आणि मोठा भडका उडाला. या भीषण आगीत चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव पवन अजमेरा (वय 52, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. तर ईशा पवन अजमेरा (वय 20) आणि विना पवन अजमेरा (वय 47) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Ashok Kharat Case: कोट्यवधी गोठवले, गाडीही केली जप्त; भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number