पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी खासगी बस उलटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर भांडगाव हद्दीत हा अपघात झाला आहे. तेलंगणाच्या दिशेने जाताना खासगी बस पलटी झाली असून जवळपास 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी आहेत. काल रात्री 9 वाजता ही भीषण दुर्घटना घडली आहे.
एक खासगी प्रवासी बस मुंबई ते निजामाबाद असा प्रवास करत होती. यावेळी पुणे – सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्याच्या हद्दीत अचानक दुचाकीस्वार समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात बस महामार्गावर उलटली झाली. अपघातावेळी बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी होते. यातील 12 ते 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे.जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव हद्दीत खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस पुण्याहून हैदराबादकडे निघाली होता. हैदराबादच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस उलटल्यानंतर प्रवाशामध्ये गोंधळ माजला. बस प्रवाशांनी भरलेली होती. यामध्ये अंदाजे ५० ते ६० लोक असल्याची माहिती मिळत आहे.
अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले. बस रस्त्यातच उलटल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरुळित करण्याचे प्रयत्न सुरू होते.