‘द केरळ स्टोरी’च्या टीमचा अपघात

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : अलीकडेच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता. देशभरात या चित्रपटावरून बरेच वाद निर्माण झालेले असताना देखील या चित्रपटाने भरगोस कमाई केली. या चित्रपटामुळे मुख्य अभिनेत्री अदा शर्मा देखील प्रकाशझोतात आली. परंतु अलीकडेच तिचा अपघात झाला आहे. यामुळे नेटकरी चिंतेत पडले आहेत. ‘द केरळ स्टोरी’या […]

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचा अपघात

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : अलीकडेच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता. देशभरात या चित्रपटावरून बरेच वाद निर्माण झालेले असताना देखील या चित्रपटाने भरगोस कमाई केली. या चित्रपटामुळे मुख्य अभिनेत्री अदा शर्मा देखील प्रकाशझोतात आली. परंतु अलीकडेच तिचा अपघात झाला आहे. यामुळे नेटकरी चिंतेत पडले आहेत.

‘द केरळ स्टोरी’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरम्यान अलीकडेच या चित्रपटाच्या टीमचा एक अपघात झाला आहे. अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन हे रविवारी तेलंगणामधल्या करीमनगर परिसरात हिंदू एकता यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणार होते. मात्र रस्त्यात चित्रपटाच्या टीमचा अपघात झाला. या अपघातात टीममधील काही सदस्य जखमी झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर आता अभिनेत्री अदा शर्माने ट्विट करत याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये ती म्हणाली,”मी ठीक आहे. आमच्या अपघाताविषयीचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मला असंख्य मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम ठीक आहे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही, चिंता करावी अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खूप खूप आभार.” तिच्या या ट्विटनंतर आता नेटकऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number