आकाश पाळण्यात केस अडकून महिलेचा अपघात

महाडमधील छबिना उत्सवामध्ये काल आकाश पाळण्यात केस अडकून महिलेचा अपघात झाला आहे. या अपघातात तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. पल्लवी सुरज कोलणकर असे या जखमी महिलेचे नाव आहे. महाडमधील छबिना उत्सवामध्ये अनेक मनोरंजन पाळणे आले होते. या उत्सवामध्ये हाताने फिरवणाऱ्या आकाश पाळण्यामध्ये पल्लवी बसली होती. यावेळी पाळणा सुरू झाला तेव्हा या महिलेचे केस […]

आकाश पाळण्यात केस अडकून महिलेचा अपघात

महाडमधील छबिना उत्सवामध्ये काल आकाश पाळण्यात केस अडकून महिलेचा अपघात झाला आहे. या अपघातात तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. पल्लवी सुरज कोलणकर असे या जखमी महिलेचे नाव आहे.

महाडमधील छबिना उत्सवामध्ये अनेक मनोरंजन पाळणे आले होते. या उत्सवामध्ये हाताने फिरवणाऱ्या आकाश पाळण्यामध्ये पल्लवी बसली होती. यावेळी पाळणा सुरू झाला तेव्हा या महिलेचे केस पाळण्यात अडकले आणि डोक्यावरील चामडीसह निघुन गेले. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी महिलेला मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी इंदल दयाराम चौहान याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number