भीषण अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी    मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावाजवळ एसटी बसने इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.   या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना डेरवणच्या वालावालकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   अपघातग्रस्त इनोव्हा कार ही गोव्यातील असून […]

भीषण अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी 

 

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. चिपळूण तालुक्यातील असुर्डे गावाजवळ एसटी बसने इनोव्हा कारला जोरदार धडक दिल्याने हा

भीषण अपघात झाला.

 

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना डेरवणच्या वालावालकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

अपघातग्रस्त इनोव्हा कार ही गोव्यातील असून वळंजू कुटूंब या कारमधून मुंबईत येत होते.  असुर्डे येथे त्यांची ही कार रस्त्याच्या बाजूला थांबलेली असताना लांज्यातून

बोरीवलीच्या दिशेने जाणा-या एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने इनोव्हा कारला मागून जोरदार धडक बसली.

 

कारमधील संजय वळंजू यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर, स्वाती वळंजू, गायत्री वळंजू, शरविली वळंजू हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

अपघात झाल्यानंतर एसटी चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले.

 

या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला. महामार्गावर दोन्ही बाजूला तब्बल 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number