खड्ड्यांमुळे अपघात, तरुणीचा मृत्यू

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या १८ वर्षांच्या तरुणीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोनाली सिंह असे या तरुणीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी पेल्हार पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खड्ड्यांमुळे मुंबई – अहमदाबाद महामार्गावर अपघात होऊन बळी जाण्याची ही […]

खड्ड्यांमुळे अपघात, तरुणीचा मृत्यू

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या १८ वर्षांच्या तरुणीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सोनाली सिंह असे या तरुणीचे नाव आहे. या अपघात प्रकरणी पेल्हार पोलिसांनी दुचाकी चालवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खड्ड्यांमुळे मुंबई – अहमदाबाद महामार्गावर अपघात होऊन बळी जाण्याची ही एका आठवड्यातील दुसरी घटना आहे. आकाश गडम आणि सोनाली ८ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात सोनालीचा मृत्यू झाला. आकाश आणि सोनाली दुचाकीवरून वाकणपाडा येथून जात असताना अपघात झाला होता.

अपघातात सोनालीच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी सोनालीला मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोनालीचा मृत्यू झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number