जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोमवारपासून वातानुकूलित लोकल गाडी चालवण्यात आली. काही प्रवाशांना याचा जरी दिलासा मिळाला असला तरी या लोकलच्या फेऱ्यांसाठी साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्यायेत.
मुळातच वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येक प्रवाशाला परवडणारे नाहीये. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेने काय साधले, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला जातोय.
साध्या लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अन्य लोकलचा पर्याय शोधावा लागणार आहे.