आजपासून मुंबईकरांचा गारेगार प्रवास… बोरिवली- चर्चगेट एसी लोकल सेवेत दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एसी लोकल येणार येणार म्हणून अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपलीय. नाताळ निमित्त बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या एसी लोकलला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आलाय. त्यामुळे रोज लोकलच्या गर्दीतून घामाघूम होत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंद लुटता आलाय. सकाळी 10 वाजता शालेय शिक्षण मंत्री विनोद […]

आजपासून मुंबईकरांचा गारेगार प्रवास… बोरिवली- चर्चगेट एसी लोकल सेवेत दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एसी लोकल येणार येणार म्हणून अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपलीय. नाताळ निमित्त बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या एसी लोकलला आज हिरवा झेंडा दाखविण्यात आलाय.

त्यामुळे रोज लोकलच्या गर्दीतून घामाघूम होत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवासाचा आनंद लुटता आलाय. सकाळी 10 वाजता शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बोरिवली स्थानकात एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवलाय.

यावेळी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार मनिषा चौधरी आणि माजी मंत्री भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ही एसी लोकल चर्चगेटपर्यंत धावलीय.

​ २५ ते २९ डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहेत. तर 1 जानेवारीपासून 12 फेऱ्या दररोज चालवल्या जातील.

यातील 8 फेऱ्या फास्ट, 3 सेमी फास्ट तर 1 फेरी स्लो असणारेय. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असणारेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number