जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एसी लोकल प्रवासाचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवासासाठी आणखी बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण मुंबईकरांसाठी तयार करण्यात आलेल्या एसी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक दोष असल्याचं खुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनीच मान्य केलं आहे.
एसी लोकलमध्ये दोष आढळून आल्यानंतर ते दूर करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं प्रभूंनी स्पष्ट केलं. तसंच मुंबई उपनगरीय लोकलमधील पीक अवरच्या काळातील गर्दी कमी करण्याकरताही रेल्वे प्रयत्न करत असून कार्यालयीन वेळा बदलण्याकरता रेल्वे मुख्यमंत्र्यांशीसुद्धा संवाद साधणार आहे.