मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषदेत जीभ घसरली. पत्रकार परिषदेत आव्हाडांकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. शिवसेनेचे आमदार संजय राऊतांनंतर शिवीगाळ करणारे आव्हाड मविआचे दुसरे नेते आहेत.
गुरुवारी (०८ जून) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी मुंब्य्रातील मोबाईल गेम आडून धर्मांतराचा मुद्दा चर्चेला आला असता आव्हाडांची जीभ घसरली. आव्हाडांनी गाझियाबाद्च्या पोलीस अधीक्षकाला भ अक्षराने सुरु होणारी शिवी दिली. यापूर्वी मविआचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत असभ्य वक्तव्य केली आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.