जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसह पाच जणांना शिक्षा सुनावण्यात येणाराय… मुंबईतील विशेष टाडा न्यायालय गुरुवारी शिक्षा सुनावणाराय.
1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात विशेष ‘टाडा’ न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेमसह सहा जणांना दोषी ठरवले, तर एकाची निर्दोष मुक्तता केली होती. बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अमलात आणून शेकडो लोकांची हत्या करणे वा हत्येचा कट रचल्याच्या प्रमुख आरोपांमध्ये या सर्वांना दोषी ठरवण्यात आले होते.