जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
विधानसभेत घडलेल्या वादानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. वंदे मातरम् म्हणण्यास विरोध करणाऱ्या अबू आझमींच्या विरोधात शिवसैनिकांनी कोल्हापुरात त्यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे.
कोल्हापुरातील शिवाजी चौकातून जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याची धिंड काढण्यात आली. तर महिला मंडळाने कोल्हापुरी चप्पलांचा प्रसादही दिला.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून. अबू आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.