‘निवडणूक आयोग बरखास्त करा’

“निवडणूक आयोग बरखास्त करा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, “निवडणूक आयोगात चाकरांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे, निवडणूक […]

‘निवडणूक आयोग बरखास्त करा’

“निवडणूक आयोग बरखास्त करा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी २० फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत, “निवडणूक आयोगात चाकरांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे, निवडणूक आयोग बरखास्त करावा”, अशी मागणी उद्धव गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अयोग्यच आहे.” “हा निकाल मला मान्य नाही” “निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयोग नेमला पाहिजे”, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
“निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर भर पावसात जवळपास २० लाख शपथपत्रे निवडणूक आयोगाला सादर केली होती.” “ही शपथपत्रे गुन्हे खात्याच्या पोलिसांनी तपासून, शपथपत्रे योग्य असून त्यात असत्य असे काही नाही, असा निकाल दिला होता.” “तरीही, निवडणूक आयोगाला आमदार खासदारांच्या संख्येवर निर्णय द्यायचा होता तर शपथपत्रे का सादर करायला लावली?”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच, “शिंदेंना धनुष्य पेलवणार नाही, शिवसेना संपवण्यासाठी हा काहींचा प्रयत्न आहे”, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number