Abhijeet Dipke: अभिजीत दीपके अडचणीत? पोलीस संरक्षण काढण्याची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा, नेमकं काय घडलं?

अभिजीत दीपके यांचं पोलीस संरक्षण काढण्याची आणि कायदेशीर कारवाईची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके अडचणीत? पोलीस संरक्षण काढण्याची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा, नेमकं काय घडलं?

अभिजीत दीपके यांच्याभोवतीचं राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी होत असताना पोलिसांशी झालेल्या शाब्दिक वादाचा व्हिडीओ समोर आला होता. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दीपके यांच्याविरोधात मोठी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासोबतच संबंधित पोलीस अधिकाऱ्याशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलीस संरक्षण हटवले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केल्यानंतर दीपके छत्रपती संभाजीनगरमध्ये परतले आहेत. त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीबाबत बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते तसेच नागरिक त्यांच्या निवासस्थानी येत असल्याने तेथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तावरून दीपके आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचा दावा करण्यात आला. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच पोलिसांकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपके एका पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या विभागाची तसेच पदाची माहिती विचारताना दिसत असल्याचे सांगितले जाते. नागरिकांना कोणाला भेटायचे आणि कोणाला भेटू द्यायचे, याबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर आता पोलीस संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. एका बाजूला दीपके यांनी पोलिसांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे पोलीस संघटनेने त्यांच्यावरच कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणाचा मुद्दा आता नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number