Abhijeet Bhande: अशोक खरातप्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, कॉल रेकॉर्डमधून धक्कादायक माहिती समोर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे. 

Abhijeet Bhande: अशोक खरातप्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, कॉल रेकॉर्डमधून धक्कादायक माहिती समोर

अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांनंतर आता प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आल्याचं दिसतंय. अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यामध्ये तब्बल 143 वेळा फोन कॉल झाले आहेत. या कॉल रेकॉर्डमध्ये अशोक खरातने अभिजीत भांडेला 83 वेळा कॉल केले आहेत. तर भांडेने खरातला 60 वेळा कॉल केले आहेत.याच पुराव्याच्या आधारे आता अभिजीत भांडे याच्या निलंबनाचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या नंतर आता अभिजीत भांडेची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडेची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याची चर्चा आहे.अभिजीत भांडे  उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number