पंढरीरायाची शासकीय पूजा संपन्न, शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर- मुख्यमंत्र्यांचं साकडं

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण म्हणजेच आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.   पहाटेच्या सुमारास डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. […]

पंढरीरायाची शासकीय पूजा संपन्न, शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर- मुख्यमंत्र्यांचं साकडं

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सण म्हणजेच आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपूरात आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

 

पहाटेच्या सुमारास डोक्यावरुन पाण्याने तर पायावर पंचामृताचा अभिषेक पार पडला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. चंदनाचा टिळा लावल्यानंतर देवाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा संपन्न झाली. शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर वारक-यांना विठ्ठल-रखुमाईचं मंदीर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमुक्त कर असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सावळ्या विठ्ठलाकडे घातलं.

 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत कुटुंबाला यंदाच्या शासकीय महापुजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. परसराव मेरत आणि त्यांच्या पत्नी अनुसया यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची शासकीय पुजा केली.

 

गरिब घरातून आलेलं हे शेतकरी दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून नित्यनेमानं वारी करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते माऊलींच्या पालखीसह वारीत पायी सहभागी होत आहेत. महापुजेनिमित्त त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एसटी महामंडळातर्फे मानाच्या पुजेचा मान मिळणाऱ्या दाम्पत्याला विशेष पास देण्यात येतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number