आमिर खानच्या लेकीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा खास व्हिडीओ

मुंबई : आमिर खान यांची मुलगी आयरा ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. आयरा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा आयरा ही सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते. आपल्या बॉयफ्रेंडवर आपलं प्रेम व्यक्त करत असते. यामुळेच सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाची मोठी चर्चा सुरु असते. आयराने आपल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच नुपूर […]

आमिर खानच्या लेकीने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा  खास व्हिडीओ

मुंबई : आमिर खान यांची मुलगी आयरा ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. आयरा ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अनेकदा आयरा ही सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते. आपल्या बॉयफ्रेंडवर आपलं प्रेम व्यक्त करत असते. यामुळेच सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाची मोठी चर्चा सुरु असते. आयराने आपल्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजेच नुपूर शिखरे बरोबर आपलं प्रेम व्यक्त करत एक व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोस्टाद्वारे आयराने नुपूर सोबत घालवलेल्या खास क्षणांना शेयर केले आहे. तसेच नुपूरला आपल्या मनातली गोष्ट देखील सांगितली आहे. आयराने आपल्या आणि नुपूरच्या खास फोटोंना एकत्र करून हा सुंदर व्हिडीओ बनवला आहे. आणि त्याला कॅप्शन देत म्हटल आहे, ’तू माझा एंकर आहेस, खूपच वेडेपणा जाणवत आहे. मात्र मी तुझ्यावर खरचं खूप प्रेम करते’. असं आयराने म्हटलं आहे. तर त्याला उत्तर देत नुपूरने सुद्धा म्हटलं आहे, ‘माझंसुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे’. आयरा खानने नुपूर शिखरेसोबत असलेलं नात कधीच लपवल नाही. ती सतत आपले खाजगी फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. आणि आपलं नुपूरबद्दल प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करत असते. या दोघांचं प्रेम पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. आणि कमेंट करून या दोघांचं कौतुक करत आहेत. आणि यांच्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. यावर अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने देखील हार्ट इमोजीशेयर करत या व्हिडीओवर प्रेम व्यक्त केल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number