वाढदिवसानिमित्त आमिरची इन्स्टाग्रामवर एन्ट्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई तो आला…त्यानं जिंकलं…’ असंच बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान च्याबाबतीत म्हणावं लागेल. ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर दबदबा असलेल्या या नायकानं आपल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामच्या जगात पहिलं पाऊल ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर येताच त्याला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक चाहत्यांनी फॉलो केलंय. त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच आहे. आमिरनं इन्स्टाग्रामवर त्याची आई झीनत […]

वाढदिवसानिमित्त आमिरची इन्स्टाग्रामवर एन्ट्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तो आला…त्यानं जिंकलं…’ असंच बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान च्याबाबतीत म्हणावं लागेल. ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर दबदबा असलेल्या या नायकानं आपल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामच्या जगात पहिलं पाऊल ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर येताच त्याला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक चाहत्यांनी फॉलो केलंय.

त्याच्या फॉलोअर्सची संख्या वाढतच आहे. आमिरनं इन्स्टाग्रामवर त्याची आई झीनत हुसैन यांचा फोटो शेअर केला आहे, ‘आज मी जो काही आहे, ते याच व्यक्तीमुळे…’ अशी भावनिक पोस्ट त्याने टाकली आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमिरचे भारतासह चीन, तुर्कस्तान, तैवान आणि रशियातही लाखो चाहते आहेत. आमिरला ट्विटरवर २३ मिलियन आणि फेसबुकवर १५ मिलियन यूजर्स फॉलो करतात.

फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असतो. वाढदिवसानिमित्त त्यानं ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले.

जोधपूरमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. दिग्दर्शकांनी मुंबईत जाण्याची परवानगी दिली आहे. आता मी कुटुंबीयांसोबत मुंबईत वेळ घालवणार आहे, असं त्यानं सांगितलं. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number