आम आदमी पार्टीचं लिंबू-मिरची आंदोलन

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक  नाशिक जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तंत्रमंत्र आणि राशीचे खडे खरेदी केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीनं जिल्हा रूग्णालयासमोर लिंबू-मिरची आंदोलन केलं. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात लिंबू, मिरचीच्या माळा घालून जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्स आणि इथल्या प्रशासनाचा निषेध केला. विज्ञानवादी डॉक्टरांनीच राशीचे खडे तसंच रत्न खरेदी करणं आणि ते ही थेट रूग्णालयात हा […]

आम आदमी पार्टीचं लिंबू-मिरची आंदोलन

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक 

नाशिक जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तंत्रमंत्र आणि राशीचे खडे खरेदी केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीनं जिल्हा रूग्णालयासमोर लिंबू-मिरची आंदोलन केलं. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात लिंबू, मिरचीच्या माळा घालून जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर्स आणि इथल्या प्रशासनाचा निषेध केला.

विज्ञानवादी डॉक्टरांनीच राशीचे खडे तसंच रत्न खरेदी करणं आणि ते ही थेट रूग्णालयात हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार असूनही रूग्णालय आणि रूग्णालयातील डॉक्टरांच्या मागे लागलेली इडापिडा टळावी, यासाठी आम आदमी पार्टीकडून हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं. दरम्यान रूग्णालयात मांत्रिकाकडून खडे खरेदी करणाऱ्या दोषी डॉक्टरांविरोधात कारवाई कऱण्याचं आश्वासन यावेळी वैद्यकीय अधीक्षकांकडून देण्यात आलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number