हा तर आदिनाथ ‘खोटा रे!’

या सायबर गुन्हेगारीची प्रकरणं वाढत चालली आहेत. मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याला देखील नुकताच सायबर क्राइमचा फटका बसला आहे. प्रसिध्द अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा असलेल्या आदिनाथने याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने आदिनाथच्या नावाने एक बोगस फेसबुक खाते उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा तयार केला होता.  त्याने आदिनाथ आणि त्याच्या […]

हा तर आदिनाथ ‘खोटा रे!’

या सायबर गुन्हेगारीची प्रकरणं वाढत चालली आहेत.

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे याला देखील नुकताच सायबर क्राइमचा फटका बसला आहे.

प्रसिध्द अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांचा मुलगा असलेल्या आदिनाथने याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या व्यक्तीने आदिनाथच्या नावाने एक बोगस फेसबुक खाते उघडून त्याचा खोटा इमेल आयडीसुद्धा तयार केला होता. 

त्याने आदिनाथ आणि त्याच्या कुटुंबाचे फोटोही या खात्यावर टाकले आहेत.

या अकाऊंटद्वारे या गुन्हेगाराने त्याचे मित्र आणि परिचितांशी संपर्क साधला आणि त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला. 

सायबर सेलच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून आदिनाथच्या तक्रारीनंतर तपासही सुरु केला आहे.

कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून तो भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 500 अंतर्गत म्हणजेच फ़सवणूक आणि बदनामी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66- सी व 66-डी म्हणजेच खोटी ओळख दाखवून संगणकाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा अंतर्गत नोंदविला गेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number