Chhatrapati Sambhajinagar News : एकुलत्या एक लेकाचा आई समोरच जीव गेला; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. अवघ्या 2 वर्षाच्या लहान बाळाचा सर्पदंशाने त्याच्या आईसमोरच मृत्यू झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : एकुलत्या एक लेकाचा आई समोरच जीव गेला; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. अवकाळी पावसानंतर राज्यात उन्हाचा कडाका बसला आहे. या उन्हाच्या लाटेमुळे जंगली सरपटणारे प्राणी त्यांच्या बिळातून थंडाव्यासाठी बाहेर पडतात. अशातच अजानता त्यांना हानी पोहचल्यामुळे आपल्या जीवावर बेतू शकतो. असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. अवघ्या 2 वर्षाच्या लहान बाळाचा सर्पदंशाने त्याच्या आईसमोरच मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे रविवारी रात्री दोन वर्षीय चिमुकला जिन्यामध्ये खेळत असताना त्याचा कोब्रा जातीच्या सापावर पाय पडला आणि त्या सापाने त्याच्यावर दंश केला. त्यानंतर चिमूरडा जोरजोरात रडू लागला. आईने त्याच्याकडे धाव घेताच त्याच्या पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्याच्या आईला दिसले.

त्यानतंर बाजूला असलेल्या सापाला बघताच आईने आक्रोश केला. त्यानंतर चिमुरड्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न सुरु झाले मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शंभू ज्ञानेश्वर दांडगे असे दोन वर्षीय चीमुरड्याचे नाव आहे. शंभू आई-वडिलांना एकुलता एक असल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number