Baramati Plane Crash : बारामतीत आणखी एक विमान कोसळले; ज्या ठिकाणी अजित पवारांचा अपघात तिथेच पुन्हा एकदा…

बारामतीत साडेतीन महिन्यात आणखी एक विमान कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बारामती मधील गोजुबावी येथे आज सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी रेडबर्ड या प्रशिक्षणार्थी कंपनीचं शिकाऊ विमान एका शेतात खाली कोसळले.

Baramati Plane Crash : बारामतीत आणखी एक विमान कोसळले; ज्या ठिकाणी अजित पवारांचा अपघात तिथेच पुन्हा एकदा…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर बारामतीत मोठी खळबळ उडाली. दरम्यान बारामतीत साडेतीन महिन्यात आणखी एक विमान कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बारामती मधील गोजुबावी येथे आज सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी रेडबर्ड या प्रशिक्षणार्थी कंपनीचं शिकाऊ विमान एका शेतात खाली कोसळले. हे शिकाऊ विमान पडतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

विमानात असणारा वैमानिक या अपघातातून बचावला असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र हे विमान जर एखाद्या घरावर कोसळल असतं तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती सुदैवाने हे विमान शेतात पडल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

विशेष  म्हणजे अजित पवारांचे विमान देखील 28 जानेवारी रोजी सकाळी साडे आठ वाजताच्या आसपास गोजुबावी गावातच झाला होता. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमानं या ठिकाणी कोसळलेली आहे. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number