टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात २४ जानेवारीपासून होत आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी-२०, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ३ वनडेसाठी टीम इंडियाची काल मंगळवारी घोषणा करण्यात आली.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी १६ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली गेली आहे. या १६ खेळाडूंपैकी तब्बल ५ खेळाडू हे मुंबईकर खेळाडू आहेत.
रोहित शर्मा (उपकर्णधार)
पृथ्वी शॉ
शिवम दुबे
शार्दुल ठाकूर
श्रेयस अय्यर
शिखर धवनला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मॅच दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे धवनला टी-२० आणि वनडे सीरिजला मुकावे लागले.
धवनऐवजी टी-२० मध्ये संजू सॅमसनला तर वनडेमध्ये मुंबईकर पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडेसाठी टीम इंडियात ५ मुंबईकर आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोशिएशनसाठी (MCA) हा गर्वाचा क्षण आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रुषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर आणि केदार जाधव.
पहिली वनडे, ५ फेब्रुवारी, सिडन पार्क, हॅमिल्टन.
दुसरी वनडे, ८ फेब्रुवारी, इडन पार्कस ऑकलंड.
तिसरी वनडे, ११ फेब्रुवारी, बे ओव्हल, माऊंट मांगनुई
दरम्यान टीम इंडिया २४ जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध पहिली टी-२० मॅच खेळणार आहे. ही एकूण ५ टी-२० मॅचची सीरिज असणार आहे.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा , संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रुषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर
२४ जानेवारी, पहिली टी-२०, ऑकलंड
२६ जानेवारी, दुसरी टी-२०, ऑकलंड
२९ जानेवारी, तिसरी टी-२०, हॅमिल्टन
३१ जानेवारी, चौथी टी-२०, वेलिंग्टन
२ फेब्रुवारी, पाचवी टी-२०, माउंट मोंगनूई