खाजगी बसला भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. कणकवली येथे खासगी बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात […]

खाजगी बसला भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. कणकवली येथे खासगी बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली शहरानजीक असलेल्या हळवल फाटा येथे तीव्र वळण आहे. या वळणावर यापूर्वी सातत्याने अपघात झाले आहेत. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज ज्या ठिकाणी ते संपते त्या ठिकाणी गड नदीवरील पूलानंतर अचानक हे वळण समोर येते. वेगात असलेले वाहन या ठिकाणी चालकाला आवरता येत नाही आणि अपघात घडतात. गेल्या काही महिन्यात सुमारे पाच ते सहा मोठी वाहने या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहेत. आतापर्यंत अनेक जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे. आज झालेला अपघात देखील अशाच प्रकारे धडकली आहे. वेगात असलेली बस या ठिकाणी आल्यानंतर चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि ही खाजगी बस पलटी झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number