नदीपात्रात बुडून दहा वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

अकोल्यातील जियान इकबाल या दहा वर्षीय बालकाचा मृतदेह वाहून जाऊन ७२ तास उलटून गेले. त्यामुळे सर्वच अकोलेकरांचे लक्ष त्याकडे लागले होते. अखेर शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या शोध पथकाला यश आले. अकोला शहरापासून १० किलोमीटर दूर पाचमोरी जवळील भोड येथील नदीपात्रात जियानचा मृतदेह आढळून आला आहे. नाल्यात गाळ आणि […]

नदीपात्रात बुडून दहा वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत

अकोल्यातील जियान इकबाल या दहा वर्षीय बालकाचा मृतदेह वाहून जाऊन ७२ तास उलटून गेले. त्यामुळे सर्वच अकोलेकरांचे लक्ष त्याकडे लागले होते. अखेर शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या शोध पथकाला यश आले. अकोला शहरापासून १० किलोमीटर दूर पाचमोरी जवळील भोड येथील नदीपात्रात जियानचा मृतदेह आढळून आला आहे. नाल्यात गाळ आणि कचरा साचल्याने त्या मुलाला शोधण्यात बुधवारी रात्री अपयश आले. अकोट फाईल पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number