Digital Arrest Case : अभिनेत्री ठरली डिजिटल अरेस्टची बळी; पोलीस अधिकारी असल्याचं सांगत 6.5 लाखांना लुटलं

दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून मुंबईत 26 वर्षीय अभिनेत्रीला गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीला तब्बल सात तासांसाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आलं.

Digital Arrest Case : अभिनेत्री ठरली डिजिटल अरेस्टची बळी; पोलीस अधिकारी असल्याचं सांगत 6.5 लाखांना लुटलं

मुंबई: एक टेलिव्हिजन अभिनेत्री डिजिटल अरनेस्टची बळी ठरली आहे. डिजिटल अरेस्ट ही सध्याची सायबर-घोटाळा करण्याची नवी पद्धत आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे पीडितांना धमकावण्यासाठी खोटे आरोप करतात आणि स्वतः पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचं भासवतात. दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून मुंबईत 26 वर्षीय अभिनेत्रीला गंडा घालण्यात आला आहे. अभिनेत्रीला तब्बल सात तासांसाठी 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आलं. तसेच तिच्याकडून 6.5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. अभिनेत्रीला बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अडकवण्याची आणि तिचा पासपोर्ट गोठवण्याची (फ्रीज) धमकी देण्यात आली. एका अ‍ॅपनं त्या नंबरवरुन आलेला फोन स्पॅम कॉल असल्याचं सांगितल्यावर अभिनेत्रीला फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अभिनेत्रीनं ताबडतोब ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. 

FIR मध्ये नमूद करण्यात आल्यानुसार, पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत आलेल्या या अभिनेत्रीला एका व्यक्तीचा फोन आला, ज्यानं स्वतःची ओळख फोन कंपनीचा कार्यकारी अधिकारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की, तिच्या सिम कार्डवरुन बेकायदेशीरपणे बँकिंग फसवणुकीची कामं करण्यात आली आहेत. त्यानंतर तिला दिल्ली पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडीओ कॉलची वाट पाहण्यास सांगण्यात आलं. गणवेशात असलेल्या बनावट पोलीस अधिकाऱ्यानं अभिनेत्रीला सर्वोच्च न्यायालयाची बनावट नोटीस दाखवून धमकी दिली. त्यानं सांगितलं की, जर तिनं चौकशीच्या नावाखाली 6.5 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्सफर केले नाहीत, तर तिचा पासपोर्ट गोठवला जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पैसे परत केले जातील, असं आश्वासनही अभिनेत्रीला देण्यात आलं. घाबरलेल्या अभिनेत्रीनं फसवणूक करणाऱ्याच्या सूचनेनुसार पैसे ट्रान्सफर केले.

हेही वाचा: Sabarimala Gold Theft Case: केरळ SIT ची मोठी कारवाई! शबरीमला सोने चोरी प्रकरणात मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी अटकेत

फसवणूक करणाऱ्याने कॉल दरम्यान अभिनेत्रीला तिचं आधार कार्ड कॅमेऱ्यासमोर दाखवण्यास सांगितले होतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते, त्या खात्याची माहिती विचारत होते. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरही फसवणूक करणाऱ्यानं तिला कॉल करणं सुरूच ठेवल्यानं अभिनेत्रीला संशय आला. तिनं तिच्या फोनवरील स्पॅम-फ्लॅगिंग अॅप तपासलं, ज्यामध्ये तिच्यासोबत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number