पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण

पुणे मेट्रो स्थानकाची खास झलक पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पुणे, १ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोदींनी हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे […]

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण

पुणे मेट्रो स्थानकाची खास झलक

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण

पुणे, १ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन मार्गिकांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मोदींनी हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात.
या नवीन मार्गाच्या लोकार्पणामुळे पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाझ ते रुबी हॉल या मार्गांवर प्रवास सोयीस्कर होणार आहे. विशेष म्हणजे मेट्रोचे किमान भाडे १०रुपये असून कमाल भाडे ३५ रुपये असणार आहे. पीसीएमसी ते वनाझ असा प्रवास करण्यासाठी मिनिटे लागणार आहेत आणि त्यासाठी ३५ रुपये भाडे लागेल तसेच पीसीएमसी ते रुबी हॉल यासाठी ३० रुपये भाडे असेल. वनाझ ते रुबी हॉल यासाठी ३५ रुपये भाडे असेल. विद्यार्थ्यांसाठी भाड्यामधे ३० टक्के सवलत असणार आहे. शनिवार रविवार सर्व नागरिकांसाठी ३० टक्के सवलत असणार आहे तसेच मेट्रो कार्ड धारकांसाठी सरसकट १० टक्के सवलत असणार आहे. मेट्रो कार्ड लवकरच विक्रीस उपलब्ध होणार आहे, असं मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे मेट्रोचे तिकीट दर –

वनाझ ते रुबी हॉल : रु. २५

पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : रु. ३०

वनाझ ते पिंपरी-चिंचवड : रु. ३५

रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : रु. ३०

वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान/पीएमसी: रु. ३०

वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन: रु. २५

रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : रु. २०

पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : रु. ३०

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number