हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जाणारा गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गिरगावातील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, दक्षिण मुंबई शिवसेना (ठाकरे), दादर, लालबाग सह उपनगरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागतयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः गिरगावमध्ये दरवर्षी निघणारी भव्य आणि आकर्षक शोभायात्रा हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. गिरगावमधील ही शोभायात्रा म्हणजे एक भव्य सांस्कृतिक मिरवणूक असते. पारंपरिक महाराष्ट्रीय वेशभूषेत सजलेले हजारो नागरिक यात सहभागी होतात.
हेही वाचा- Dombivli Gudi Padwa: डोंबिवलीत गुढीपाडव्याची भव्य तयारी! डोंबिवलीत 150 फूट गुढीसह भव्य शोभायात्रा, देशभक्तीपर थीम ठरणार खास आकर्षण
गिरगावमधील याच शोभायात्रेला ठिकठिकाणाहून लोक सहभागी होण्यासाठी येतात. यानिमित्त मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी गुढीपाडव्यानिमित्त विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर टिटवाळा आणि आसनगाव दरम्यान 18/19.02.2026 बुधवार आणि गुरुवार मध्यरात्र रोजी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. मुंबई विभाग एमएसईटीसीएल द्वारे 400 केव्ही लाइनच्या स्ट्रिंगिंग कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या सर्वांमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
यावेळी मध्य रेल्वे, मुंबई विभाग एमएसईटीसीएल द्वारे 400 केव्ही लाइनच्या स्ट्रिंगिंग कामासाठी, 18 आणि 19 मार्च 2026 रोजी बुधवार/गुरुवारी रात्री टिटवाळा आणि आसनगाव स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' नॉर्थ ईस्ट मार्गावर विशेष 'पॉवर ब्लॉक' परिचालीत करणार आहे.
हेही वाचा- New Mumbai Local Train: बदलापूरकरांचा प्रवास आता सुस्साट; नवी मुंबईसाठी नव्या रेल्वे मार्गाची तयारी, रेल्वेमंत्र्यांचे थेट आदेश
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यरात्रीच्या 2 वाजून 10 मिनिटांनी ते 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्या- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला वाशिंद येथए 2 वाजून 27 मिनिटांपासून रात्री 2 वाजून 50 पर्यंत थांबवण्यात येणार आहे. तसेच शालिमार-लोकलमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला आसनगाव येथे रात्री 2 वाजून 37 पासून ते रात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत तर हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसला आटगाव येथे रात्री 2 वाजून 38 मिनिटांपासून रात्री 2 वाजून 50 मिनिटांपर्यंत थांबण्यात येणार आहे. त्यामुळे या गाड्यांना साधारण 20 ते 25 मिनिटांचा विलंब होणार आहे.