आंबेडकर, राऊत यांच्यात ठिणगी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. पण, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकरचांच्या विधानाशी आम्ही […]

आंबेडकर, राऊत यांच्यात ठिणगी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. पण, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं. यावर संजय राऊत यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सुनावलं आहे.

आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकरचांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचितची युती झाली. आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि वंचित यात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत अशाप्रकारची विधाने करणे आम्हाल मान्य नाही.’ आंबेडकर यांनी जुन्या गोष्टी विसरून आघाडी मजबूत करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी आंबेडकर यांना फटकारले आहे.

शरद पवार हे देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार हे भाजपचे आहेत, असं म्हणणं हा त्यांच्या कारकिर्दीवरील मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षापूर्वी भाजपचं सरकार दूर ठेवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येऊ दिलं नसतं, असं राऊत म्हणाले. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number