Buldhana Malkapur : मतदार यादीच्या पडताळणीतून उलगडलं 24 वर्षांचं गूढ! BLO च्या संवेदनशीलतेमुळे हरवलेला मुलगा आईकडे परतला

बुलढाणा : “सरकारी कामकाज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या फक्त कागदपत्रं अन् तासनतास चालणारी प्रक्रिया. पण याच सरकारी प्रक्रियेने एका आईच्या आयुष्यात 24 वर्षांनी आनंदाचा प्रकाश आणला आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR च्या मतदार यादी पडताळणीदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आणले. सोलापूरमधील केडगाव येथून 24 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला मुलगा नवनाथ गायकवाड […]

Buldhana Malkapur : मतदार यादीच्या पडताळणीतून उलगडलं 24 वर्षांचं गूढ! BLO च्या संवेदनशीलतेमुळे हरवलेला मुलगा आईकडे परतला

बुलढाणा : “सरकारी कामकाज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या फक्त कागदपत्रं अन् तासनतास चालणारी प्रक्रिया. पण याच सरकारी प्रक्रियेने एका आईच्या आयुष्यात 24 वर्षांनी आनंदाचा प्रकाश आणला आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR च्या मतदार यादी पडताळणीदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आणले. सोलापूरमधील केडगाव येथून 24 वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला मुलगा नवनाथ गायकवाड आज त्याच्या आईला सापडला आहे. घरून निघून गेलेला मुलगा गेल्या 24 वर्षांपासून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात वास्तव्यास होता. SIR च्या निमित्ताने मतदार पडताळणी दरम्यान तो बुथ लेव्हल ऑफिसर (BLO) नीता भोंबे यांना मिळून आला आहे. त्यानंतर सोलापूर येथून संपूर्ण कुटुंबाने त्याची भेट घेतली आहे. याबाबतची माहिती मलकापूरच्या बुथ लेव्हल ऑफिसर नीता भोंबे यांनी दिली. 

हेही वाचा : Cabinet Decisions: 5 नवीन न्यायालये अन् शेतीत AI चा वापर… मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 8 मोठे निर्णय

मुलगा जिवंत असल्याचं कळताच आई, भाऊ, बहीण आणि नातेवाईकांनी एका क्षणाचाही विलंब न करता जवळपास ४०० किलोमीटरचा प्रवास करून ते थेट मलकापुरात पोहोचले. सकाळी अचानक मुलासमोर उभे राहिले. 24 वर्षांनंतर आईने आपल्या लेकराला मिठी मारली. आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाऊ, बहीण आणि उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला नेमकं काय घडत आहे, हेच समजलं नाही. पण सत्य समजताच वातावरण आणखी भावनिक झाले. आईने आपल्या सुनेच्या गळ्यात स्वतःचं सोन्याचं मंगळसूत्र घातलं आणि प्रेमाने म्हणाली आता इथे नका राहू आमच्यासोबत घरी चला. नवनाथ यांनीही लवकरच गावी येण्याचे आश्वासन दिले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number