Kolhapur Crime : अमरावती नंतर आता कोल्हापुरात ब्लॅकमेलीगचा प्रकार उघड; 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ बनवून…

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण सुरु असताना आता कोल्हापुरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Kolhapur Crime : अमरावती नंतर आता कोल्हापुरात ब्लॅकमेलीगचा प्रकार उघड; 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ बनवून…

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील गाजत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण सुरु असताना आता कोल्हापुरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील आरोपी शाहिद सनदे हा तरुणीवर अत्याचार करून त्याचे व्हिडीओ मित्राला शेअर करत असल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी आरोपी शाहिद सनदे याला अटक करण्यात आली असून शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे. शिरोली गावामध्ये घडलेल्या अश्लील कृत्याचा विरोध करण्यासाठी शिरोली गावकरी एकवटले आहेत.

तसेच संस्थेत आरोपीच्या त्याच बरोबर त्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या घरावर बुलडोझर चालवावा अशी मागणी आता शिरोली गावकरी करत आहेत. कोल्हापुरातील शिरोली गावामध्ये घडलेल्या अश्लील कृत्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी केली. या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी केली जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number