Pandharpur Crime : पंढरपूरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! महिला स्वच्छतागृहातून संतापजनक प्रकार उघडकीस

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Pandharpur Crime : पंढरपूरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! महिला स्वच्छतागृहातून संतापजनक प्रकार उघडकीस

राज्यात दररोज कानावर पडणाऱ्या महिला सुरक्षेबाबतच्या बातम्या ऐकून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकताच अधिक मास सुरू झाल्याने देशभरातून हजारो भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. अशातच काल महाद्वार परिसरातील महिलांच्या सुलभ शौचालयात एक अज्ञात इसम महिलेचे चोरून चित्रीकरण करत असताना नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली होती. त्यानंतर संबंधितावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- Pune Shocking Video : रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला, धारदार हत्याराने सपासप वार आणि नंतर पुलावरून खाली फेकलं; व्हिडीओ व्हायरल

ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी शेजारील महिलांच्या स्वच्छता व सुलभ शौचालयात असाच संतापजनक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात इसम डोकावून पाहून चित्रीकरण करू लागला आहे. 

हे स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेच्या लक्षात येताच महिलेने आरडाओरडा सुरू केला असता अज्ञात इसमाने पळ काढला. मात्र यामुळे स्थानिक विक्रेत्या महिला व महिला भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता याबाबत पोलीस प्रशासन काय कडक पावलं उचलतय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number