Railway Crime: अपघात की घातपात? धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

काही दिवसापूर्वी मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती. यानंतर अशीच आणखी एक घटना समोर आली होती.

Railway Crime: अपघात की घातपात? धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

काही दिवसापूर्वी मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती. यानंतर अशीच आणखी एक घटना समोर आली होती. गोंदिया-वडसा मेमू लोकलमधून प्रवास करणार्‍या महिलेला धावत्या रेल्वेतून खाली धक्का देऊन तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या दरम्यान ग्राम गणखैरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पोल क्रमांक 1009/15 समोरील रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडला होता.

हेही वाचा- Jalgaon Crime : बाळ अंध जन्माला आल्याचा राग अनावर! सासू-पतीने निष्पाप बाळासह आईसोबत केलं थरकाप उडवणारं कृत्य; चिमुरड्याचा मृत्यू, आई….

ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या या प्रकारात सुरुवातीला अपघाती मृत्यू मानले जात होतं. इतकचं नव्हे तर गोंदिया ग्रामीण पोलिसांनी देखील आधी ही घटना अपघाती असल्याची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान, रेल्वेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेचा उलगडा झाल्याने एकच खळबळ उडाली. कामावरून घरी परतण्यास उशीर झाल्याने मयत महिलेचा भाऊ मंगेश विनायक धमगाये हा तिला शोधण्यासाठी बाहेर पडला. त्यावेळी गुरुवारी गणखैरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाशेजारी महिलेचा मृतदेह आढळला.

रितू धमगाये (43) रा. गणखैरा, ता. गोरेगाव असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपीने नेमक्या कोणत्या वादातून रेल्वेतून धक्का देऊन हत्या केली याचे कारण अद्याप समोर आले नसून आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number