Solapur Crime : सोलापूर हादरलं! साखरपुडा झाला, काही महिन्यांत लग्न होणार होत पण…; 22 वर्षीय तरुणासोबत भयंकर घडलं

सोलापूरतील पोलीस चौकीच्या इतक्या जवळ एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शांतीनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur Crime : सोलापूर हादरलं! साखरपुडा झाला, काही महिन्यांत लग्न होणार होत पण…; 22 वर्षीय तरुणासोबत भयंकर घडलं

सोलापूरतील पोलीस चौकीच्या इतक्या जवळ एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शांतीनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमर मौलाली बिराजदार (वय 22) असे मृत तरुणाचे नाव असून तो सोलापुरातील मठाजवळ, सिद्धेश्वर गांधी नगर येथील रहिवासी होता. काही महिन्यांपूर्वीच उमर मौलाली बिराजदार याचा साखरपुडा झाला होता. तसेच येत्या दोन-तीन महिन्यांत लग्न देखील होणार होते. 

हेही वाचा- Vikroli Crime News : मुंबई हादरली! पहाटे 2 वाजता मोठ्याने गाणी लावण्याच्या वादातून कुटुंबात राडा; धारदार चाकूहल्ल्यात दोघांचा मृत्यू

मात्र लग्नाआधीच तरुणाची हत्या करण्यात आली आहे. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच उमरचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बिराजदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उमर मौलाली बिराजदार याचा मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तसेच उमर मौलाली बिराजदारच्या मृतदेहाजवळ एक दुचाकीही आढळली. दरम्यान धारदार शस्त्राने वार करून उमरची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच डीसीपी प्रीतम यावलकरांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिराजदार आणि सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान पोलीस चौकीच्या इतक्या जवळ हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number