Pimpri Chinchwad News : धक्कादायक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने सुरक्षारक्षकाने गमावला जीव; शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक अत्यंत धक्कादाय घटना घडली आहे. शाळेचे एक मोठे लोखंडी गेट अंगावर पडून शाळेतील सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय नागनाथ कांबळे (वय 52) असे मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोतदार इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने केलेल्या निष्काळजीपणामुळे संजय कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. हेच लोखंडी गेट जर […]

Pimpri Chinchwad News : धक्कादायक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने सुरक्षारक्षकाने गमावला जीव; शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पोतदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक अत्यंत धक्कादाय घटना घडली आहे. शाळेचे एक मोठे लोखंडी गेट अंगावर पडून शाळेतील सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संजय नागनाथ कांबळे (वय 52) असे मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. पोतदार इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने केलेल्या निष्काळजीपणामुळे संजय कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. हेच लोखंडी गेट जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडून शाळेकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही, हेच या घटनेने पाहायला मिळत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत विद्यार्थी बचावले असले तरी सुरक्षारक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणात वाकड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र सुरक्षारक्षक कांबळे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या शाळा प्रशासना विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : Chandipura Virus : भयंकर विषाणूचा शिरकाव! आतापर्यंत 22 मुलांनी गमावला जीव; इतका प्रभावी चांदीपुरा व्हायरल आहे तरी काय?

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number