Vikroli Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार! विक्रोळीत संरक्षण भिंत कोसळली; मोठा अपघात टळला

उन्हाच्या झळा सोसल्यानंतर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना पावसाने चांगलचं झोडपलं आहे. अशातच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Vikroli Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा हाहाकार! विक्रोळीत संरक्षण भिंत कोसळली; मोठा अपघात टळला

उन्हाच्या झळा सोसल्यानंतर चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना पावसाने चांगलचं झोडपलं आहे. मध्यरात्री सुरु असलेल्या पावसामुळे वाहतूकीसह रेल्वे देखील खोळंबली आहे. अशातच मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील श्यामलाल सोहनलाल गुप्ता चौकाजवळ असलेल्या सनसिटी कॉम्प्लेक्स परिसरात भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेनंतर, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक प्रशासक आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा- Mumbai Local Update: मुंबईत मुसळधार पाऊसाचा फटका रेल्वे वाहतुकीवर; ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प, पश्चिम आणि सेंट्रलचं काय?

रात्रभर संततधारेने कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. एकीकडे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मध्यरात्री पासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला आहे.

नवी मुंबईत ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल ट्रान्स हार्भर लोकलवरील माती खचल्याने लोकल विस्कळीत झाली आहे. यावेळी पनवेलहून नवी मुंबईला येताना अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. तुर्भे ते कोपरखेरने दरम्यान पावसामुळे रेल्वे रुळखालील माती खचल्याने वाहतूक सकाळी 6 वाजल्यापासून विस्कळीत झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान रेल्वे पोलीस बंदोबस्तात माती टाकण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. दरम्यान तुर्भे आणि कोपर खैरने येथे ट्रकवर पाणी साचल्याने ट्रान्स हार्बर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या स्थानकाच्या रेल्वे ट्रकवर आतापर्यंत पाणी येण्याचा पहिलाच अनुभव असून रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number