ठाण्यातील कळवा भागात गर्भवती पत्नीला जिवंत जाळले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जाळल्याचे कारण समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील कळवा भागातील मफतलाल कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत ६ महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटातला जीव दगावला असून महिलेची प्रकृती गंभीर झाली आहे. या महिलेवर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी पती अनिल चौरसियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.