Satara News : सातारा MIDC मध्ये धक्कादायक घटना! परप्रांतीय कामगाराने उचललं टोकाचं पाऊल; सहकाऱ्यांनी धाव घेताच पाहिलं थरारक दृष्य

सातारा वाई येथील एमआयडीसी परिसरात एका परप्रांतीय कामगाराने आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Satara News : सातारा MIDC मध्ये धक्कादायक घटना! परप्रांतीय कामगाराने उचललं टोकाचं पाऊल; सहकाऱ्यांनी धाव घेताच पाहिलं थरारक दृष्य

सातारा वाई येथील एमआयडीसी परिसरातील एका फाउंड्री कंपनीत कार्यरत असलेल्या मूळच्या झारखंड येथील 42 वर्षीय दुर्गा रोधा प्रधान रा.राजाबासा या परप्रांतीय कामगाराने आगीच्या भट्टीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गा रोहिता प्रधान (वय 42, मूळ रा. राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम, राज्य झारखंड, सध्या रा. वाई एमआयडीसी परिसर) अशी मृत कामगाराची ओळख आहे. मृत कामगाराने आगीच्या भट्टीत उडी घेताच कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला.

हेही वाचा- Nanded Teacher Case : कार नदीत कोसळण्यापूर्वी घडला होता भयंकर प्रकार…, नांदेड शिक्षक आत्महत्या प्रकरणात नवं वळण

मात्र भट्टीतील तीव्र उष्णतेमुळे कामगाराची जागीच होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फाउंड्रीमध्ये काम सुरू असताना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून वाई येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तसेच झारखंडमधील त्यांच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

मृत कामगाराची मानसिक स्थिती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान प्रधान यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number