Assembly Elections 2026: पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूमध्ये मतदानाचा महा-रेकॉर्ड! पहिल्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान; 2021 चा विक्रम मोडीत

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत नवा इतिहास रचला आहे.

Assembly Elections 2026: पश्चिम बंगाल अन् तमिळनाडूमध्ये मतदानाचा महा-रेकॉर्ड! पहिल्या टप्प्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान; 2021 चा विक्रम मोडीत

Assembly Elections 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी झालेल्या मतदानात सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 89.93 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2021 च्या निवडणुकीत याच जागांवर 81.16 टक्के मतदान झाले होते, त्या तुलनेत 2026 मध्ये मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढली असून हे ‘रेकॉर्ड ब्रेक’ मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  दरम्यान, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतही सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82.24 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तमिळनाडूनमध्ये 2021 मध्ये 73.63 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. बंगाल आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांनी मतदानाचे जुने विक्रम मोडीत काढल्याने 2026 ची ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे.

152 जागांवर चुरशीची लढत आणि कडेकोट बंदोबस्त
पहिल्या टप्प्यात बंगालमधील 152 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले, जिथे एकूण 1,478 उमेदवार नशीब अजमावत आहेत. निवडणूक आयोगाने या टप्प्यासाठी 44,000 हून अधिक मतदान केंद्रे उभारली होती. यातील 7,384 केंद्रे ‘अत्यंत संवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आली होती, जिथे निमलष्करी दलांचा कडा पहारा होता. एकूण 3 कोटी 60 लाख मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. ही लढत प्रामुख्याने सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात असल्याचे चित्र असून दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.

जिल्ह्यानुसार मतदानाची टक्केवारी: दक्षिण दिनाजपूर अव्वल
बंगालच्या कानाकोपऱ्यातून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यानुसार आकडेवारी पाहिल्यास दक्षिण दिनाजपूर जिल्ह्याने 93.12 टक्के मतदानासह आघाडी घेतली आहे. तर कूचबिहार (92.07 टक्के), बीरभूम (91.55 टक्के) आणि मुर्शिदाबाद (91.36 टक्के) मध्येही विक्रमी मतदान झाले आहे. सर्वात कमी मतदान कालिम्पोंग जिल्ह्यात (81.98 टक्के) झाले असले, तरी ते इतर राज्यांच्या सरासरीच्या तुलनेत जास्तच आहे. दार्जिलिंगमध्येही 86.49 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

महिलांचे वर्चस्व आणि ‘मॉडेल बूथ’चे आकर्षण
निवडणूक आयोगाने यंदा महिला मतदारांसाठी विशेष व्यवस्था केली होती. एकूण 5,444 मतदान केंद्रांचे संपूर्ण व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आले होते. याशिवाय, 207 ‘आदर्श मतदान केंद्रे’ उभारण्यात आली होती, जिथे मतदारांना पिण्याचे पाणी, सावली आणि इतर सोयीसुविधा पुरवण्यात आल्या होत्या. यामुळे मतदानाचा उत्साह वाढण्यास मोठी मदत झाली.

हेही वाचा – West Bengal Election 2026: राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर ‘अगदी ऐन वेळी’ निशाणा; भाजपचा राहुल गांधींना खोचक ‘थँक्यू’

पुढील टप्प्याचे नियोजन आणि तमिळनाडूची स्थिती
पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील हा प्रचंड उत्साह आता दुसऱ्या टप्प्यातही कायम राहतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मतदानाचा दुसरा टप्पा पुढील बुधवारी पार पडणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number