वजन कमी करण्यासाठी त्याने केलं ‘गूगल सर्च’, आणि गमावले प्राण!

कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी हल्ली सगळ्यात पहिली धाव घेतली जाते ती ‘गूगल’कडेच. मात्र गुगलवर सगळ्याच गोष्टींची माहिती मिळत असली, तरी ती योग्यच असेल, असं नव्हे. डॉक्टरांचा सल्ला न घेता गुगलवर सर्च करून स्वतःवर उपचार करणं आणि त्यात सांगितलेली औषधं घेणं हे रुग्णाच्या जीवावर कसं बेतू शकतं, याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला. वजन कमी करण्याच्या नादात एका […]

वजन कमी करण्यासाठी त्याने केलं ‘गूगल सर्च’, आणि गमावले प्राण!

कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी हल्ली सगळ्यात पहिली धाव घेतली जाते ती ‘गूगल’कडेच. मात्र गुगलवर सगळ्याच गोष्टींची माहिती मिळत असली, तरी ती योग्यच असेल, असं नव्हे. डॉक्टरांचा सल्ला न घेता गुगलवर सर्च करून स्वतःवर उपचार करणं आणि त्यात सांगितलेली औषधं घेणं हे रुग्णाच्या जीवावर कसं बेतू शकतं, याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला. वजन कमी करण्याच्या नादात एका 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

ताप आला, अंगदुखी किंवा साधं डोकं जरी दुखलं तरी आपण डॉक्टरांकडे न जाता स्वतः पेनकिलर घेऊन गप्प बसतो. इतकंच काय तर गोळी माहीत नसेल तर एका क्लिकवर गूगल करून औषधांची माहिती घेतो. जर तुम्ही असे करत असाल तर थांबा ! कारण ही गोष्ट तुमच्या जीवावरही उठू शकते. नागपूरमधील 27 वर्षीय पारितोष चिखलकर याने आपल्या लठ्ठपणावर गूगलद्वारे उपचार करण्यास सुरूवात केली. यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे न जाता स्वतःच औषध घेऊ लागला, आणि हेच उपचार त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारितोषचा मृतदेह 8 एप्रिल 2017 ला सापडला होता. मात्र त्यावेळी त्याच्या मृतदेहावर कोणतीही जखम नव्हती. शिवाय त्यावेळी केलेल्या तपासणीवेळी त्याने विष घेतलं असल्याची देखील माहिती मिळाली नव्हती. ज्यावेळी सौरभचा मृतदेह सापडला होता, त्यावेळी त्याठिकाणी अनेक औषधंही मिळाली होती. फॉरेन्सिक सायन्स, टेक्निकल एव्हिडन्स आणि व्हीसेरा रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण विष घेऊन आत्महत्या केल्याचं नव्हतं असं स्पष्ट झालं.

त्यानंतर पोलिसांनी परितोषच्या मोबाईलची तपासणी केली. यामध्ये परितोषने गूगलवर वजन कमी करण्याची औषधं सर्च केल्याची माहिती पुढे आली. गूगलवर सर्च करून त्यावर दिसणारी औषधं, त्यांचं प्रमाण, त्यांचे परिणाम इत्यादी गोष्टी विचारात न घेता तसंच आपल्या शरीराला ती कितपत योग्य आहेत, याची खातरजमाही करून घेता वापरल्याने परितोषवर प्राण गमावण्याची वेळ आली.

या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात देखील खळबळ माजली. इंडियन मेडिकल कॉउंसिल च्या डॉक्टरांनी ‘गुगल’वरचे उपचार घातक असून सर्वांनीच यापासून धडा घेण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने वैद्यकीय कायद्याची नीट अंबलबजावणी करावी अशी मागणीदेखील केली. तर वजन कमी करण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांना जिम ट्रेनरने गुगलवर दिसणारी औषधं टाळण्याचा आणि नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला. नागपूरची ही घटना इंटरनेटच्या दुष्परिणामांची एक बाजू आहे … त्यामुळे सर्वांनीच आता याचा दुसऱ्या बाजूने विचार करण्याची गरज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number