Uttar Pradesh News : वादळी वाऱ्यात तरुण उंच फुटबॉलसारखा हवेत उडाला; काळजा ठोका चुकवेल असा Video समोर

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान पाहायला मिळाले. अशातच होल्डिंगवर उभा असलेला एक व्यक्ती या वादळी वाऱ्यात थेट पतऱ्यासारखा उडाल्याचा पाहायला मिळाला आहे.

Uttar Pradesh News : वादळी वाऱ्यात तरुण उंच फुटबॉलसारखा हवेत उडाला; काळजा ठोका चुकवेल असा Video समोर

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये वादळी वाऱ्याचे थैमान पाहायला मिळाले. पावसासह चक्रीवादळात अनेक लोक यात जागीच ठार झाले. अशातच होल्डिंगवर उभा असलेला एक व्यक्ती या वादळी वाऱ्यात थेट पतऱ्यासारखा उडाल्याचा पाहायला मिळाला आहे. यादरम्यानच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड हवेत उडाल्याने त्याला पकडून असलेला एक तरुण 50 फूट उंच फुटबॉलसारखा हवेत उडाल्यानंतर तो तरुण थेट शेतात जाऊन पडला. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तरुणाला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केले.

हेही वाचा- Sangli News : जत तालुक्याती खाटली गावात हृदयद्रावक घटना, वादळी वाऱ्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस आणि गारपिटीसह आलेल्या भयंकर वादळामुळे किमान 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच या वादळात शेकडो जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. या वादळाचा फटका उत्तर प्रदेशातील ३६ जिल्ह्यांना बसला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रयागराज हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला असून, पाच तालुक्यांमध्ये मिळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये पाच महिला, चार मुले आणि आठ पुरुषांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वादळानंतर लगेचच अनेक भागांचा संपर्क तुटला होता. भारतीय हवामान विभागाने लखनौ, प्रयागराज, जौनपूर आणि बांदा यांसह 38 जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. येत्या काही तासांत मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 60 किमी वेगापर्यंत पोहोचणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number