साहेबांच्या नावाने रुग्णालय आणि स्मारक होईल – मुख्यमंत्री शिंदे

नाशिकमधील सिन्नरमध्ये नांदूर शिंगोटे येथे शनिवारी लोकनेते गोपीनात मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट बदलणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने रुग्णालय उभारा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. […]

साहेबांच्या नावाने रुग्णालय आणि स्मारक होईल – मुख्यमंत्री शिंदे

नाशिकमधील सिन्नरमध्ये नांदूर शिंगोटे येथे शनिवारी लोकनेते गोपीनात मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा पट बदलणारं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने रुग्णालय उभारा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे पंकडा मुंडे यांच्या विनंतीला मान देत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने रुग्णालय होईल आणि त्यांचं स्मारकही होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

तसेच, पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाची मागणी करण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे वसतिगृहदेखील लवकरच उभारण्यात येतील तर ऊसतोड कामगार महामंडळ बळकट करू असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री दादा भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर असणे ही गोपीनाथ मुंडे यांची देन असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number