बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शेलोडी गावातील शेतात असलेल्या कडब्याला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात कडबा जळून खाक झाला आहे.. तब्बल चार तास या कडब्याची आग ही धुमसत होती. सुदैवाने या कडब्याची ज्वारी आधीच काढून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव झाला आहे.मात्र तरीही मोठ्या प्रमाणात हा कडबा जळाल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.. स्थानिकांनी अग्निशमन दलालाही या कडब्यावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाचारण केलं होतं. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवल्याने ही आग परिसरातील शेतात पसरली नाही.. वादळी वाऱ्यासह कडाडत असलेल्या विजांमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज स्थानिक शेतकरी लावत आहेत.